बद्रीनाथ हायवेचा काही भाग कोसळला, 1000 यात्रेकरू अडकले, हिमाचलमध्ये 24 दिवसांत 27 वेळा ढगफुटी, 158 मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने रस्ते बंद आहेत.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे 200 मीटर वाहून गेला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे 1000 हून अधिक भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

हिमाचल प्रदेशात जूनपासून ढगफुटीच्या जवळपास 35 घटना घडल्या आहेत. गेल्या 24 दिवसांत 27 वेळा ढगफुटी झाली. पुरामुळे 158 लोकांचा मृत्यू झाला आहे. 606 घरांची पडझड झाली असून 5363 घरांचे नुकसान झाले आहे.

त्याचवेळी दिल्लीत पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. मंगळवारी सकाळी 205.45 एवढी पाणीपातळी नोंदवण्यात आली. आज येथेही पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तास कसे असतील…

या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल: हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश.

या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *