पुणे शहरात वर्षभरात अडीच लाख नवीन वाहनांची भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । शहरातील वाहनांच्या संख्येचा आकडा फुगत चालला असून, 2022 मध्ये 2 लाख 55 हजार 757 नवीन वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे जून 2023 पर्यंत एकूण 35,94, 132 वाहनांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयार केला जातो. सन 2022-23 वर्षाचा पर्यावरण अहवाल महापालिकेने बुधवारी जाहीर केला. या अहवालात शहरातील वृक्ष, पक्षी, कचरा, पाणी, वायू प्रदूषण आदी माहिती देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण सुधारण्यासंदर्भात केल्या जाणार्‍या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे.

प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, खासगी वाहनांचा वापर अद्याप कमी होताना दिसत नाही. जून 2023 पर्यंत एकूण 35 लाख 94 हजार 132 वाहनांची नोंद झाली असून, सन 2021 (1 लाख 69 हजार 552) च्या तुलनेत सन 2022 मध्ये नवीन 2 लाख 55 हजार 757 वाहनांची भर पडली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पीएमपीएलच्या एकूण 2 हजार 79 बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी 1 हजार 421 बसेस सीएनजी इंधनावर तर 458 इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

महापालिकेचा पर्यावरण अहवाल जाहीर

सन 2020-21 मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर 4463.59 एमयू इतका होता तर सन 2021-22 मध्ये वाढून 4982.89 एमयू इतका झाला. रहिवासी भागात सन 2020-21 मध्ये ऊर्जा वापर 2045 एमयू इतका होता तर सन 2021-22 मध्ये वाढून 2944 एमयू इतका झाला.
शिवाजीनगर आणि हडपसर येथे हवा प्रदूषण जास्त आढळून आले आहे.
 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *