Gold-Silver Price on 27 July 2023: सोन्याच्या दर विक्रमी पातळीवर ; तर चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,९३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,७४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७६० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,७८० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,७६० प्रति १० ग्रॅम आहे.  नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *