WhatsApp युजर्सची धमाल, बनवता येणार 1 मिनिटाचा Video; चॅटिंग स्टाईल बदलणार, आलं नवं फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग एप WhatsApp ने नवीन फीचर जारी केलं आहे. WhatsApp ने शॉर्ट व्हिडीओ मेसेजचे फीचर जारी केलं आहे, याचा अर्थ आता तुम्ही कोणत्याही मेसेजला व्हिडीओसह रिप्लाय देऊ शकता. आधी रिप्लायसाठी टेक्स्ट आणि ऑडिओचा पर्याय होता. हा रिअल टाईम व्हिडीओ मेसेज असेल जो 60 सेकंदांचा असेल. WhatsApp ने म्हटलं आहे की हा छोटा व्हिडीओ रिप्लाय मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल.


WhatsApp चे हे फीचर हळूहळू प्रसिद्ध होत आहे. लवकरच ते ग्लोबली लाँच केलं जाईल. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या नवीन अपडेटची माहिती दिली आहे. या व्हिडीओ मेसेजचा वापर वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठीही करता येणार असल्याचे WhatsAppचं म्हणणं आहे.

टेक्स्ट बॉक्सच्या पुढे व्हिडिओ मेसेजचा पर्याय दिसेल. बाय डीफॉल्ट व्हिडीओ मेसेजमधील ऑडिओ म्यूट केला जाईल, परंतु तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते चालू करू शकता. हे फीचर मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं WhatsApp अपडेट करू शकता.

WhatsApp ने अलीकडेच iPhone युजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे, जे प्लॅटफॉर्मवरील लुक आणि सिक्योरिटी वाढवते. WhatsApp ने ट्रान्सफर चॅट फीचर तसेच सायलेन्स अननोन कॉलर फीचर आणि अनेक नवीन फीचर अपडेट्स जारी केले आहेत.

सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की WhatsApp iOS वर App व्हर्जन 23.14.79 जारी करत आहे. नवीन अपडेटमध्ये युजर्सचा अनुभव आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल समाविष्ट आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *