महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. पावसाळ्यात डोळे येणे,डोळ्याला खाज सुटणे,डोळे लाल होणे आणि डोळे चिकट होणे असे आजार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जे.जे रुगणालायातील नेत्र चिकित्सातज्ञ प्रियांका धायतडक यांनी महत्वाची माहिती दिली आहे. डोळ्यांची साथ पसरत आहे आणि नागरिकांनी यावर योग्य काळजी घ्यावी.