महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । अॅशेसमधील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २९५ धावांत संपुष्टात आणल्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाला सुरुवात केली. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. इंग्लंडने दिवसअखेर ९ बाद ३८९ धावा काढल्या. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी केली. स्टार्कने सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत डेकतच्या (४२) रूपाने दिवसाचा पहिला बळी घेतला. मात्र, स्टोक्सने क्रॉलीसोबत ६१ धावांची भागीदारी केली. कर्णधार स्टोक्सला मर्फीने पायचीत केले. बेअरेस्टाेने ६८ धावांची खेळी केली. जो रूटने १०६ चेंडूंत ९१ धावा केल्या. त्याने अॅशेस मालिकेतील दुसरे अर्धशतक केले. अलीने २९ धावा काढल्या. मिचेल स्टार्कने ४ व मर्फीने ३ गडी बाद केले.
मी अद्याप निवृत्त होत नाही ः जेम्स अँडरसन
अँडरसनने निवृत्तीची बातमी खोडून काढली. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बळी घेतल्यानंतर त्याने आपला फॉर्म परत मिळवण्याची आशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की ‘मला माझे निर्णय स्वतःच घ्यायचे आहेत. मी निवृत्तीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण गेली ६ वर्षे लोक फक्त माझ्या निवृत्तीबद्दलच प्रश्न विचारतात. त्यामुळे संघाच्या विजयात मी अधिक योगदान देताेय.
इंग्लिश खेळाडूंनी डिमेन्शियाशी लढणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ जर्सी बदलली
अॅशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने चुकीची जर्सी घालून केली. डिमेन्शियाशी लढणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ इंग्लिश संघाने हे केले.
धावफलक
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली (गोलंदाजी) इंग्लंड पहिला डाव (एकूण 283/10) ऑस्ट्रेलिया पहिला डाव (एकूण 295/10) इंग्लंड दुसरा डाव धावा चेंडू 4/6 क्रॉली झे. स्मिथ गो. कमिन्स 73 76 9/0 डकेट झे. कॅरी गो. स्टार्क 42 55 7/0 स्टोक्स झे. कमिन्स गो. मर्फी 42 67 3/1 जो रूट त्रि. गो. मर्फी 91 106 11/1 ब्रुक झे. कॅरी गो. हेजलवुड 7 6 0/1 बेअरस्टो झे. कॅरी गो. स्टार्क 78 103 11/0 अली झे. हेजलवुड गो. स्टार्क 29 38 4/0 वाेक्स झे. ख्वाजा गो. स्टार्क 1 5 0/0 वुड झे. मार्श गो. मर्फी 9 11 1/0 ब्रॉड नाबाद 2 2 0/0 अँडरसन नाबाद 8 14 2/0 अतिरिक्त: 7. एकूण: 9 बाद 389 धावा. गडी बाद: 1-79, 2-140, 3-213, 3-213 4-222, 5-332, 6-360, 7-364, 8-375, 9-379. गोलंदाजी: स्टार्क 19-2-94-4, हेजलवूड 15-0-67-1, कमिन्स 16-0-79-1, मार्श 8-0-35-0, मर्फी 22-0-110-3.