Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
भिडेंच्या वक्तव्याचा निषेध:फडणवीस म्हणाले-अशी विधाने खपवून घेणार नाही, कुणीही महापुरूषांबद्दल असे बोलू नये - Maharashtra 24

भिडेंच्या वक्तव्याचा निषेध:फडणवीस म्हणाले-अशी विधाने खपवून घेणार नाही, कुणीही महापुरूषांबद्दल असे बोलू नये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापुरुषांविरोधात कुणीही वक्तव्य करु नये, असा सल्ला फडणवीस यांनी भिडेंना दिला आहे.

भिडेंच्या वक्तव्याचा निषेध
“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकांबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे आणि कुणीही करु नये” असे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.

असे बोलणे खपवून घेणार नाही
“अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाही. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वांतंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत” असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *