महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. अपल्याला असं वाटतं की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. फळे आणि भाज्या बर्याच काळासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात.अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्हणून सिद्ध होतो. फ्रीज ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधील एक मोठी उत्क्रांती मानली जाऊ शकते. यामध्ये आपण अन्न आणि पेय दीर्घकाळापर्यंत ताजे ठेवू शकतो.फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात. तसेच खराब होण्याची शक्यता कमी असते.भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते.
पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते.असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीही टाळावे.आणखी एक असही फळ आहे, जे फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनू शकतो, ते फळ कोणतं आहे, तुम्हाला माहितेय का?
टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विष बनते, अशी माहिती आहे.टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. वास्तविक, कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणूनच चुकूनही टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये.
टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. वास्तविक, कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणूनच चुकूनही टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये.