सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना निगडी पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा दिला होता इशारा

पिंपरीः
पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पणदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड., मोशी येथील वेस्ट टू एनर्जी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिंपरी-चिचवड शहरातील रेडझोनचा प्रश्न अद्याप सुटला नाही. परिणामी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यासाठी कित्येक वर्षांपासून आंदोलने, निदर्शने, निषेध मोर्चे काढत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीकडे राजकीय व्यवस्था जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतापलेले सामाजिक कार्यकर्ते काळभोर यांनी आता पंतप्रधानांनाच लक्ष्य केल्यामुळे आजच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यास विरोध दर्शवून काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर निगडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत सचिन काळभोर यांना आज सकाळीच ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा तसेच ग्रामिण पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांची धरपकड केलेली आहे. पुणे पोलिसांनी सतर्कता दर्शवून चोख बंदोबस्त पार पाडण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार निगडी पोलिस आपले कर्तव्य बजावत असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *