IND vs WI 3rd ODI: निर्णायक सामन्यातही विराट, रोहितला विश्रांती? पाहा काय असेल टीम इंडियाचा मास्टरप्लान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । India vs West Indies Playing 11: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. ३ वनडे सामन्यांची मालिका ही १-१ च्या बरोबरीत आहे.

त्यामुळे दोन्ही संघांना ही मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. मालिका जिंकण्याची समान संधी असल्याने दोन्ही संघ जोर लावताना दिसून येऊ शकतात.


मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीजने कमबॅक करत ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता अंतिम सामना कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसऱ्या वनडेत भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले होते. विराट कोहली आणि रोहित शर्माला बाहेर ठेवलं गेलं होतं. आता अंतिम सामन्यातही हे दोघे बाहेर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जर या दिग्गज खेळाडूंचं कमबॅक झालं तर अक्षर पटेल आणि संजू सॅमसनला बाहेर बसावं लागेल. दुसऱ्या वनडेत संजू सॅमसन ३ वर तर अक्षर पटेल ४ क्रमांकावर फलंदाजीला आला होता. 

संजू सॅमसन, अक्षर पटेलला विश्रांती..
दुसऱ्या वनडेसाठी अक्षर पटेल आणि संजू सॅमसनला संधी दिली गेली होती. मात्र दोघेही फ्लॉप ठरले होते. संजू सॅमसनला केवळ ९ धावा करता आल्या होत्या. तर अक्षर पटेल १ धाव करत माघारी परतला होता. त्यामुळे या दोघांनाही संधी मिळणं कठीण आहे.

अशी असू शकते प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link