आता दादा कोंडके यांचे गाजलेले सिनेमे तुम्हाला घरबसल्या येणार अनुभवता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । अभिनेते दादा कोडंके यांना आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. आजही दादांचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार असून, दादांचा काळ प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. त्यामुळे नव्या पिढीला देखील दादा कोंडके कळणार आहेत. ८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादांचा १९६९ ला ‘ तांबडी माती ’ या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास १९९४ ला ‘ सासरचं धोतर ’ या सिनेमापर्यंत येउन थांबला. ८ ऑगस्टला दादा कोंडके यांची ९१ वी जयंती आहे. यानिमित्ताने दादांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. चाहत्यांना दादा कोंडके यांचे सहा सिनेमे चाहत्यांना घरबसल्या पाहता येणार आहे.


‘सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ अशा सिनेमांचा आनंद देण्यासाठी दादा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सत्तरच्या दशकातील मराठी सिनेमा आठवून बघा. तमाशापटांचा काळ सरला होता आणि विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होतं. जाणून घ्या कधी आणि कसे पाहता येणार दादा कोंडके यांचे सिनेमे…

सिनेमांचं वेळापत्रक ( दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता )

६ ऑगस्ट – ‘येऊ का घरात’ १३ ऑगस्ट – ‘सासरच धोतर’ २० ऑगस्ट – ‘राम राम गंगाराम’ २७ ऑगस्ट – ‘हयौच नवरा पाहिजे’ ३ सप्टेंबर – ‘बोट लावेल तिथे गुदगुल्या ‘ १० सप्टेंबर – ‘आलिया अंगावर’

दादा कोंडके यांचे सहा सिनेमे चाहत्यांना ‘झी टॉकीज’वर पाहता येणार आहेत. सिनेमातू पुन्हा दादा कोंडके पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. एक काळ असा होता जेव्हा दादा कोंडके यांच्या सिनेमांसाठी सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. आता, नव्या पिढीला देखील दादा कोंडके कळणार आहेत. सध्या सर्वत्र दादा कोंडके यांची चर्चा रंगली आहे.

गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी या रूपातील रांगडा नायक दादा कोंडके यांनी अफलातून साकारला. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मालिका सलग ६ रविवारी प्रेक्षकांसाठी झी टॉकीजने आणली आहे. यानिमित्ताने दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *