नवीदिल्ली ; कोरोनारुग्णांना घरच्या घरी उपचार देता हेत हॉस्पिटल्स, १७ दिवसांची ट्रिटमेंट !

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- नवीदिल्ली – अजय सिंग : कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयातही जागा अपुरी पडत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अधिकाधिक राज्य सरकारे आता सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच, काही खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना ‘होम केअर असिस्टन्स’ देण्यास सुरुवात केली आहे.

गुरुग्राममध्ये कोरोनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली. त्यानंतर दिल्लीतील काही रुग्णालयांनी ‘होम केअर असिस्टन्स’चा प्रयोग सुरू केला. यात, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाशी डॉक्टर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्लामसलत करतात. रुग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतोय, हे त्यावरून लक्षात येतं. त्याला अ‍ॅडमिट करायची गरज नाही, याची खात्री झाल्यानंतर, रुग्ण ‘होम केअर असिस्टन्स’ पॅकेज घ्यायचं का हे ठरवू शकतात. त्यानंतर त्यांना घरातच कशाप्रकारे काळजी घ्यायची, याबाबत आवश्यक सूचना केल्या जातात. रुग्णाला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यात नाडीचा अभ्यास आणि वेळेवर रुग्णाच्या शरीराच्या तापमान तपासणीचा समावेश आहे. या डेटाचे परीक्षण डॉक्टरांची टीम करते, अशी माहिती फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्रामच्या विभागीय संचालक डॉ. रितू गर्ग यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिली.

रुग्णाशी रोज फोनवरून संपर्क साधला जातो. आहारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही रुग्ण घेऊ शकतात. या उपचारांदरम्यान रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला किंवा अन्य एखादं गंभीर लक्षण दिसलं तर त्याने त्वरित रुग्णालयात संपर्क साधायचा असतो. गरजेनुसार त्याला रुग्णवाहिका पुरवली जाते. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा उपचारांचा कालावधी 17 दिवसांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *