नांदेड; कोरोनातून 23 व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा – विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड – नांदेड: दि.२१ : डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 15 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने जिल्ह्यातील एकुण 23 बाधितांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 209 व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आज सायं 5 वाजेपर्यंत नांदेड शहरातील राजनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष, रहेमतनगर येथील 48 वर्षाचा एक पुरुष आणि भगतसिंग रोड नांदेड येथील 55 वर्षाची एक महिला आहे. याचबरोबर 62 वर्षाचा पिरबुऱ्हानगर येथील एका पुरुष रुग्णाचा 19 जून रोजी मृत्यू झाला आहे. मृत्यूपश्चात सदर रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 77 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.आजच्या 4 बाधित व्यक्तींमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 301 एवढी झाली आहे. पुणे येथून 2 कोरोना बाधित रुग्ण वय 12 व 16 वर्षे तसेच मंडई नांदेड येथील रहिवासी असलेली 45 वर्षाची माहिला हैद्राबाद येथून संदर्भीत करण्यात आली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्याची एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 304 एवढी झाली आहे. आतापर्यंत 304 बाधितांपैकी 209 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 81 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात 81 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 20 जून रोजी 45 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 825,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 639,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 950,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 04,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 209,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 81,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 45 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *