पीक कर्ज मागणी नोंदणीस 30 जून पर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड : दि. २० :खरीप पीक कर्ज हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी मंगळवार 30 जून 2020 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशात संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगमात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 हा कालावधी दिला होता. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 530 शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदविली आहे. पीक कर्ज मागणी नोंदणी याद्या व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँक शाखेस पाठविण्यात आली आहे. खरीप पीक कर्ज हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मंगळवार 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *