लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांना कमजोर बनवतोय कोरोनाव्हायरस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी- ओमप्रकाश भांगे – : दि.२१ : चीनमध्ये लक्षणं दिसणाऱ्या आणि लक्षणं न दिसणाऱ्या अशा कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. 37 कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं होती, तर 37 कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं नव्हती. हे सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही आठवड्यांनी त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.लक्षणं न दिसणाऱ्या गटात 62.2 टक्के तात्पुरत्या स्वरूपात अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या. तर लक्षणं दिसणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण 78.4 टक्के होतं. तर लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांच्या शरीरातील अँटिबॉडीज नंतर कमी झाल्या तसंच त्यांच्यातील 18 अँटि इन्फ्लेमेटरी सेल सिग्नलिंग प्रोटिनची पातळीही कमी झाली होती. यामुळे लक्षणं न दिसणाऱ्या गटातील लोकांमधील रोगप्रतिकारक प्रणाली कोरोनाव्हायरसला प्रतिरोध करण्यात कमजोर झाली आहे, असं समजून येतं.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात काही कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसत आहेत (Symptomatic corona patient), तर काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत (Asymptomtic corona patient). लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांना लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांप्रमाणे त्रास होत नसला तरी हा व्हायरस लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांपेक्षा त्यांना जास्त कमजोर बनवतो आहे.

नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार लक्षणं दिसणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity system) जास्त कमजोर झाली आहे.

ज्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, मुळात त्यांनाच आपल्याला कोरोना झाला आहे याची माहिती नसते. त्यामुळे ते डॉक्टरकडे जात नाहीत, त्यांची तपासणी होत नाही आणि त्यांना कोरोना असल्याचं निदान होत नाही. परिणामी त्यांच्यावर उपचार सुरू होत नाहीत. दरम्यान या अभ्यासानंतर आता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *