महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – : दि.२१ : हिंगोली: हिंगोली पोलिस दलातील कर्मचारी श्री. जितेंद्र साळी यांनी स्वतः जवळील बंदुकीच्या गोळ्या झाडून आज दूपारी आत्महत्या केली आहे. ही घटना पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारातील शस्त्रगार विभागात घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली पोलिस दलातील कर्मचारी श्री. जितेंद्र साळी हे पोलिस अधिक्षक कार्यालयातील शस्त्रगार विभागात कार्यरत होते. शनिवार दि. 20 जुन रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास ते शस्त्रगार विभागात होते. याच ठिकाणी त्यांची नियुक्ती होती. परंतु दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या कडील बंदूकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली. नेमकी आत्महत्या कशामुळे केली याची माहिती घेण्यात येत आहे. परंतु पोलिस दलात यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस मुख्यालायतील आरमारा विभागात (शस्त्र दुरुस्ती) जितेंद्र साळी (४३) हे कर्मचारी मागील काही दिवसांपासून कार्यरत होते. आज दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच एसएलआर रायफलने हनुुवटीच्या खालच्या भागातून गोळी मारून आत्महत्या केली. मुख्यालयातून गोळी उडाल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहऱ्याचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी घटनास्थळी घेतली. घटनास्थळावर पंचनामा सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंंबियांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, मयत जितेंद्र साळी हे मुळचे कळमनुरी येथील रहिवासी आहेत. सन २००१ मध्ये हिंगोली पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यानंतर त्यांनी अरमोरर विभागात काम सुरु केले होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर अात्महत्येचे नेमके कारण समजू शकणार आहे.