ग्लेनमार्क फार्मा आणले करोनावर परिणामकारक औषध, गोळीची किंमत १०३ रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – : दि.२१ – करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने (Glenmark Pharmaceuticals) औषध आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. कंपनीने ही माहिती दिली. ‘डीजीसीआई’ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

ग्लेनमार्क फार्मा ही औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील सहा महिन्यांपासून जगभरात करोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कुणालाही त्यात यश आले नव्हते. अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. पण ग्लेनमार्क फार्मान करोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध आणले आहे. याची एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे.

करोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबीफ्ल्यू ( FabiFlu) या ब्रँड अंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे करोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे.

देशात करोनाचे रुग्ण सुरुवातीच्या तुलनेत सध्या वेगाने वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा दबाव आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मंजुरी मिळाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. फेविपिरावीरच्या उपयोगाने रुग्णांवर प्रभावी उपचार करता येणार आहे, असं ग्लेनमार्कचे अध्यक्ष आणि संचालक ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितलं.

देशातील करोना रुग्णांची संख्य वेगाने वाढत आहे. आज एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. आज १४, ५१६ नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्णांची एकूण संख्या ही ३, ९५, ०४८ इतकी झाली आहे. तर करोनाने देशात एकूण १२, ९८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *