महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । Alex Hales Retired: काही दिवसांपूर्वीच ॲशेस मालिकेचा थरार रंगला होता. ही मालिका झाल्यानंतर संघातील प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. ब्रॉडसह मोईन अलीने देखील निवृत्तीची घोषणा केली होती. आता ॲलेक्स हेल्सच्या तडकाफडकी निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच ॲशेस मालिकेचा थरार रंगला होता. ही मालिका झाल्यानंतर संघातील प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. ब्रॉडसह मोईन अलीने देखील निवृत्तीची घोषणा केली होती. आता ॲलेक्स हेल्सच्या तडकाफडकी निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र तो टी -२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येणार आहे.
अशी राहिली कारकिर्द
ॲलेक्स हेल्सने २०२२ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.यादरम्यान त्याने २७.३ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या आहेत.यादरम्यान ९४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. तर ७० वनडे सामने खेळताना त्याने ३७.८ च्या सरासरीने २४१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. तर टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ७५ टी -२० सामन्यांमध्ये २०७४ धावा केल्या.