महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । Mitchell Marsh named as Australia’s new T20 captain : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मिचेल मार्शवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला आता टी-20 संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक सुरू होण्यास 12 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पुढील टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने कांगारू संघाने तयारीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. नवा कर्णधार म्हणून मिचेल मार्श मॅथ्यू वेडची जागा घेईल.
मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपला शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. आता त्यांची कर्णधार पदावरून हकालपट्टी करत मिचेल मार्श नवा कर्णधार करण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्या सामन्यात मिचेल मार्शही संघाचा भाग होता. मार्शने कर्णधार होण्यापूर्वी टी-20 खेळाडू म्हणून शेवटच्या सामन्यात 30 चेंडूत 45 धावा केल्या होत्या. पण, आता तो केवळ टी-20 संघाचा खेळाडूंच नसून कर्णधारही असणार आहे.
मिचेल मार्शची टी-20 कारकीर्द
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शने आतापर्यंत 46 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1086 धावा करण्यासोबतच 15 विकेट्स घेतल्या आहेत. जिथे त्याने बॅटने 6 अर्धशतके झळकावली आहेत.
कर्णधार म्हणून मिचेल मार्श दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून संघाची धुरा सांभाळणार आहे. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला 5 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.
Presenting your 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India! 🏆🇦🇺 pic.twitter.com/h6jVWYJvMy
— Cricket Australia (@CricketAus) August 7, 2023
मिचेल मार्शची टी-20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा तो 12 वा खेळाडू असेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत पॅट कमिन्स मनगटाच्या दुखापतीतून सावरला नाही, तर मिचेल मार्श वनडेतही कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे, अशीही बातमी आहे.
ऑस्ट्रेलियाला डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेत तिन्ही टी-20 सामने खेळायचे आहेत. हे सामने 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत खेळवले जातील. त्यानंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघ निवडीचा प्रश्न आहे, तो 28 सप्टेंबरपूर्वी निवडला जाऊ शकतो.