Pune News : आता पुणे, नाशिक प्रवास होणार आरामदायक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । नाशिकवरुन थेट पुणे प्रवास करण्यासाठी सध्या रेल्वेने नाही. भविष्यात या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन सुरु होणार आहे. परंतु हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून मोठा कालावधी आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचे काम सुरु आहे. जोपर्यंत रेल्वे सुरु होत नाही, त्यामुळे पुणे-नाशिक प्रवास रस्ते मार्गानेच सध्या होत आहे. आता हा प्रवास अधिक चांगला होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे, मुंबईप्रमाणे हा प्रवास होणार आहे.


काय होणार सुरु
पुणे, मुंबई मार्गावर एसटीने इलेक्ट्रीक बस सुरु केली आहे. आता पुणे-मुंबई महामार्गप्रमाणे इलेक्ट्रीक शिवनेरी बसेस नाशिक मार्गावर सुरु होणार आहे. नाशिक-पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. नाशिक विभागात दोन नव्या इलेक्ट्रिक ई-शिवाई बस दाखल झाल्या आहेत. या बसेसची चाचणी केल्यानंतर प्रवाशांना या बसची प्रत्यक्षात सेवा मिळणार आहे.

काय असणार दर
पुणे नाशिक मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी सध्या शिवनेरीची सेवा सुरु आहे. पुणे, मुंबई मार्गावर इलेक्ट्रीक बसेस म्हणजे ई-शिवाई सुरु झाल्या. त्यामुळे या मार्गावरील शिवनेरी बसेस नाशिक मार्गावर सुरु करण्यात आल्या. सध्या अनेक जण या सुविधेचा शिवनेरी बसेसमधून प्रवास करत आहेत. पुणे नाशिक आणि नाशिक पुणे जन शिवनेरी सेवा सकाळी ५ वाजेपासून सुरु आहे.

किती असणार तिकीट
पुणे नाशिक मार्गावर शिवशाही बसेस सुरु होत्या. त्यानंतर जन शिवनेरी बसे सुरु झाल्या. या बसेसचा तिकीट दर शिवशाहीपेक्षा २५ रुपयांनी जास्त आहे. शिवशाही बसेचा तिकीट दर ४७५ रुपये होते तर जन शिवनेरी बसेचा दर ५०० रुपये आहे. इलेक्ट्रीक शिवनेरी बसचा दर जन शिवनेरी प्रमाणेच असणार आहे. त्यात काहीच बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक पुणे प्रवास फक्त रस्ते मार्गानेच सध्या करता येतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नाशिक ते कल्याण आणि कल्याण ते पुणे हा मार्ग आहे. परंतु त्यालाही सहा ते सात तास लागतात आणि रस्ते मार्गानेही सहा तास लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *