Tech Tips: स्मार्टफोनद्वारे कंट्रोल करा टीव्ही, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । आपण प्रत्येकजण टीव्ही बघतो. आपल्याला टीव्हीवर वेगवेगळे चॅनल्स पाहण्यासाठी किंवा आवाज कमी करण्यासाठी गरज पडते ती म्हणजे रिमोटची. मात्र कधी-कधी आपल्याकडून रिमोट हरवतो. किंवा तो खराब होतो. तसेच अनेकदा तो बेड,सोफा यांच्याखाली गेल्याने तो खूप वेळ शोधण्याची गरज पडते. रिमोट हरवला किंवा खराब झाल्यास आपल्याला टीव्ही ऑपरेट करण्यास अडचण निर्माण होते. मात्र आता तुम्ही तुमचा स्मार्टफोन देखील रिमोट म्हणून वापरू शकता. ते कसे ते पाहुयात.

आता तुम्ही गुगल टीव्ही अँपसह तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अँड्रॉइड टीव्ही कंट्रोल करू शकता. म्हणजेच तुम्हाला उठून सारखा रिमोट शोधण्याची गरज नाही. स्मरतोंच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते चॅनेल पाहू शकता तसेच कंटाळा आल्यास चॅनेल्स बदलू देखील शकता. तसेच आवाज नियंत्रित करू शकता. हे अँप Android आणि आयफोन या दोन्हीवर चालते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनवर गुगल टीव्ही अँप सेट करण्यासाठी आणि स्मार्टफोनचा टीव्हीचा रिमोट म्हणून कसा वापर करायचा याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.

Android –

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून गुगल टीव्ही अँप इन्स्टॉल करावे.

२. तुमचा टीव्ही आणि फोन एकाच वायफाय नेटवर्कवर असल्याची खात्री करावी. जर का तुमच्या टीव्हीमध्ये वाय-फाय नसल्यास तुम्ही तुमचा फोन आणि टीव्ही कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ देखील वापरू शकता.

३. त्यानंतर गुगल टीव्ही अँप उघडावे. एकदा अँप ओपन झाल्यानंतर खालीलबाजूस उजव्या कोपऱ्यात रिमोट बटणावर क्लिक करावे.

४. त्यानंतर अँप डिव्हाइसेसना स्कॅन करण्यास सुरूवात करेल. स्कॅनिंगमध्ये तुमचा टीव्ही सापडला की तो सिलेक्ट करावा.

५. तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक कोड दिसेल. अँपमध्ये कोड एंटर करावा आणि पेअरवर क्लिक करावे.

६. एकदा का तुमचा फोन तुमच्या टीव्हीसह कनेक्ट झाला की, नेहमीच्या रिमोटप्रमाणेच टीव्ही कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

हेही वाचा: आता व्याकरणाच्या चुका कमी होणार; Google ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर, जाणून घ्या

iPhone

१. सर्वात पहिल्यांदा तुमचा आयफोन आणि टीव्ही एकाच वायफाय नेटवर्कशी कनेक्ट असल्याची खात्री करावी.

२. अँप स्टोअरवरून गुगल टीव्ही अँप डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे.

३. त्यानंतर तुमच्या आयफोनमध्ये गुगल टीव्ही अँप ओपन करावे.

४. अँप ऑटोमॅटिक तुमचा टीव्ही शोधण्यास सुरूवात करेल. त्या सर्चमध्ये तुमचा टीव्ही सापडत नसल्यास डिव्हाइसेस स्कॅन या बटणावर क्लिक करावे.

५. एकदा का तुमचा टीव्ही सर्चमध्ये सापडला कि तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारा ६ आकड्यांचा कोड एंटर करावा.

६. त्यानंतर पेअरवर क्लिक करून आयफोन टीव्हीला कनेक्ट करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *