माजी मंत्री नवाब मलिकांना ‘सर्वोच्च’ दिलासा! मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत एक सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून नवाब मलिक तुरुंगात आहेत. (NCP leader Nawab Malik Interim Bail)

दोन महिन्यांचा जामीन मंजूर…

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या सात महिन्यांपासून अटकेत असलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन त्यांना महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लाँर्डिंग प्रकरण (Money Laundering Case) तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

प्रकृतीच्या कारणावरून मिळाला जामीन…

याच प्रकरणात ईडीने नबाव मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. गेल्या सात महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे ईडीने (ED) म्हणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *