महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये दूध आणि तुपाचे विशेष असे महत्त्व आहे. दूध-तुपातील पोषक तत्त्वांमुळे घरातील वडीलधारी मंडळी हे दुग्धजन्य पदार्थ खाण्यावर अधिकाधिक भर देतात.
रोज नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणे हा भारतीय कुटुंबीयांचा नियमच आहे, पण तूप मिक्स करून दूध प्यायल्याने आरोग्यास मिळणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
तूप मिक्स करून दूध पिण्याचे फायदे
धूळ-माती-प्रदुषणामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिकच कोरडी आणि निस्तेज झाली आहे का? तर मग दुधामध्ये तूप मिक्स करून आपण हे पौष्टिक पेय पिऊ शकता. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो होतो, शिवाय नैसर्गिकरित्या त्वचा हाइड्रेटही होते. एक्झिमासारख्या आजारावर हे पेय रामबाण उपाय आहे.
सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय
सायनस, सर्दी-खोकला यासारख्या आजारांची समस्या असल्यास तुपयुक्त दूध पिणे अतिशय लाभदायक ठरेल. हवे असल्यास आपण दुधामध्ये हळद देखील मिक्स करू शकता. हळदीमध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी-खोकल्याच्या त्रासातून आराम मिळतो.
कॅल्शिअमचा होतो पुरवठा
उतारवयात तुपयुक्त दूध पिणे अतिशय आवश्यक आहे. कारण दुधामध्ये कॅल्शिअम (calcium food) असते, ज्यामुळे हाडे (bone health tips in marathi) आणि स्नायू (joint pain) मजबूत होण्यास मदत मिळते. तसंच शरीराची पचनक्रिया देखील मजबूत होते.
नियमित तूपयुक्त दूध प्यायल्यास गर्भवती महिलांच्या आरोग्यासही अनेक फायदे मिळतील. यामुळे गर्भातील बाळाचा चांगला विकास होण्यास मदत मिळते.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.