Gold Silver Price: सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । मे आणि जून महिन्यात सोने-चांदीला (Gold Silver Price Today) मोठी उडी घेता आली नाही. सोने 58,000 रुपयांच्या घरात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात सोन्याने जवळपास 2000 रुपयांची आगेकूच केली. चांदीने पण घौडदौड केली. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदी आणखी पुढचा टप्पा गाठतील असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज होता. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र तीन महिन्यात दोन्ही धातूंना कोणताही नवीन विक्रम करता आलेला नाही. यामहिन्याची सुरुवात दरवाढीने झाली. पण पुढील दहा दिवसांत पडझडीचेच सत्र सुरु आहे. आता तर भावात अजून नरमाई आली आहे. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

ऑगस्ट महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये सोने 1000 रुपयांनी स्वस्त झाले. या काळात सोन्यात फक्त दोनदा वाढ झाली. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली होती. तर 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते. तर 8,9,10,11 ऑगस्ट या चार दिवसांत सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली. 12 ऑगस्ट रोजी भावात किंचित सुधारणा झाली.

ऑगस्ट महिन्यात चांदीने स्वस्ताईचा षटकार हाणला. चांदी 5300 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी चांदी घसरली. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी उतरली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. चार दिवसांत या किंमतीत 2100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,909 रुपये, 23 कॅरेट 58,673 रुपये, 22 कॅरेट सोने 53,961 रुपये, 18 कॅरेट 44,182 रुपये, 14 कॅरेट सोने 34,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,176 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *