राज्यपाल रमेश बैस यांचा पिंपरी-चिंचवड दौरा, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना निगडी पोलिसांकडून बजावली नोटीस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा १४ वा पदवीप्रदान समारंभ आज सोमवार (दि.१४) सकाळी ११ वाजता पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमिवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पाच पेक्षा जास्त नागरिकांना जमावबंदीचे आदेश दिले आहेत. पूर्व परवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना ताब्यातदेखील घेतले जाणार आहे.

या कार्यक्रमात कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, रमाय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स क्वालिटी अॅश्युरन्स अँड एक्सलन्स सेलचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत लाभणार आहे.

विद्यार्थ्यांचा पदवीप्रदानात समावेश..
प्रावीण्य संपादन केलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, विद्याशाखेतील ४०९५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून, यामध्ये १४ पीएच.डी., ३०१५ पदव्युत्तर पदवी, २०५५ पदवी व ११ पदविका ८ शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *