Pune EV : पुणेकरांची वाढती पसंती; वर्षात 30 हजारांहून अधिक ईव्ही वाहनांची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्याला भविष्यात पेट्रोल-डिझेल मुक्त करण्याची घोषणा केली होती. पुणेकरांनी मात्र आधीपासूनच यादृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये गेल्या वर्षात तब्बल 30 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे.

पुणे प्रादेशिक परिवाहन कार्यालयाने (RTO) 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये तब्बल 30,869 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी केली आहे. यानंतर मार्च 2023 पर्यंत पुण्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 46,067 एवढी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या केवळ 15,000 एवढी होती. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Pune EV)
.
पेट्रोलच्या वाहनांची पसंती घटली
मिळालेल्या आकडेवारीनुसार, शहरात पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची एकूण संख्या 37,77,973 एवढी आहे. त्यापैकी गेल्या वर्षीच्या कालावधीमध्ये (1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023) 1,83,766 वाहनांची नोंद झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये झालेल्या वाढीच्या तुलनेत ही केवळ 5 टक्के अधिक आहे. (EVs Registered in Pune)

काय आहेत कारणं?
पुण्यात इलेक्ट्रिक वाहनं वाढण्यास कित्येक गोष्टी कारणीभूत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मिळणारी टॅक्स सूट, वाढलेले चार्जिंग युनिट आणि लोकांमध्ये वाढलेली जागरुकता ही यातील मुख्य कारणं असू शकतात. डेप्युटी आरटीओ संजीव भोर यांनी याबाबत माहिती दिली.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठराविक प्रकारची इलेक्ट्रिक वाहनं चालवण्यासाठी लायसन्स आणि नोंदणीची गरज नसते. 250 वॅटपेक्षा कमी पॉवर असलेल्या आणि 25 किमी प्रतितास यापेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या ईव्हींचा यात समावेश होतो.

पुण्यात पेट्रोलच्या गाड्या 84 टक्के
31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुण्यात एकूण 44,87,523 वाहनं आहेत. यांपैकी 46,067 इलेक्ट्रिक आहेत. पुण्यातील एकूण वाहनांपैकी 84 टक्के वाहनं पेट्रोलवर धावणारी आहेत. एक टक्का वाहनं इलेक्ट्रिक आहेत. तर, बाकी 15 टक्के वाहनांमध्ये डिझेल, सीएनजी आणि एलपीजीवर धावणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *