महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । Independence Day 2023 : आज देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी लाल किल्ल्यावरुन बोलताना त्यांनी देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं. बदलत्या जगाला आकार देण्यात 140 कोटी भारतीयांचं सामर्थ्य दिसत आहे, असं ते म्हणाले.
6G साठी तयार
टेक्नॉलॉजी क्षेत्रातही भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. गेल्या वर्षी देशात 5G तंत्रज्ञान लाँच करण्यात आलं होतं. आता आपला देश 6G साठी देखील तयार असल्याचं पंतप्रधान मोदी आज म्हणाले.
6G व्हिजन डॉक्युमेंट
पंतप्रधान मोदींनी यावर्षी मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्युमेंट लाँच केलं होतं. यासोबतच त्यांनी 6G रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्ट बँड लाँच केलं होतं. देशात हे नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी या डॉक्युमेंट्सचा फायदा होणार आहे. (Independence Day)
भारताचं टेक-दशक
“सध्याचं दशक हे भारतासाठी टेक-दशक आहे. भारताचं टेलिकॉम आणि डिजिटल मॉडेल हे स्मूथ, सिक्युअर, ट्रान्सपॅरंट, ट्रस्टेड आणि टेस्टेड आहे.” असं पंतप्रधान मोदी या 6G व्हिजन डॉक्युमेंटच्या लाँचिंगवेळी म्हणाले होते. टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने हे डॉक्युमेंट तयार केलं आहे. देशात 6G साठी रोडमॅप तयार करण्याचं काम हा ग्रुप करत आहे.