विलंबित ITR भरताना नवीन कर प्रणालीमध्ये स्विच करताय का? वाचा नियम काय सांगतो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । ३१ जुलै ही आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख होती. तथापि जर करदात्याने या तारखेच्या आत आयकर रिटर्न भरले नाही तर आता त्यांच्याकडे दंड भरून आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत असेल. तथापि, हा इन्कम टॅक्स रिटर्न विलंबित आयकर रिटर्न म्हणून ओळखला जाईल. सध्या जुनी आणि नवी कर व्यवस्था या दोन कर व्यवस्था आहेत. अशा परिस्थितीत विलंबित प्राप्तिकर रिटर्न भरताना व्यक्ती नवीन कर पद्धतीचा पर्याय निवडू शकते का? अशा प्रश्न उपस्थित होतो.

जर एखादी व्यक्ती पगार, घराची मालमत्ता किंवा इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळवत असेल परंतु आर्थिक वर्ष २०२२-२३ व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नसेल तर त्याच्याकडे नवीन कर प्रणाली हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अशी व्यक्ती विलंबित आयटीआर दाखल करताना नवीन कर प्रणालीची निवड करू शकणार नाहीत.

विलंबित ITR दाखल करताना नवीन कर प्रणाली कोण स्विच करू शकते?

व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेले लोक फॉर्म 10-IE भरून आयकर विभागाला कर प्रणालीची निवड कळवून नव्या कर प्रणालीची निवड करू शकतात किंवा निवड रद्द करू शकतात.

विलंबित प्राप्तिकर रिटर्न भरल्यास दंड
विलंबित ITR दाखल करण्यासाठी निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास एखाद्या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड भरावा लागतो. तथापि जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच उशीरा किंवा विलंबित ITR दाखल करणार्‍या करदात्यांना आयकर देय असल्यास दरमहा १% दंडात्मक व्याज देखील द्यावा लागेल.

विलंबित ITR कसा भरायचा?
मूळ आयटीआर प्रमाणेच ई-फायलिंग पोर्टलवर विलंबित आयटी रिटर्न दाखल केले जाऊ शकते, तथापि काही फरक आहेत. विलंबित ITR फॉर्म भरताना व्यक्तीने १३९(११) ऐवजी कलम १३९(४) निवडणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *