Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
स्वातंत्र्य दिनानिमित्त SpiceJet ची खास ऑफर! फक्त १५१५ रुपयांत करा विमान प्रवास - Maharashtra 24

स्वातंत्र्य दिनानिमित्त SpiceJet ची खास ऑफर! फक्त १५१५ रुपयांत करा विमान प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2023) भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटकडून (SpiceJet) एक उत्तम ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही स्वस्त विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकता. कंपनीने खास इंक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेलची (special Incredible Independence Day sale) घोषणा केली आहे.

हा सेल उद्यापासून म्हणजेच १४ ऑगस्टपासून सुरू झाला असून तो २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. स्पाइसजेट सेलमध्ये तुम्ही तुमचे विमान प्रवासाचे तिकीट फक्त १५१५ रुपयांमध्ये बुक करू शकता. या तिकिटाच्या रकमेत सर्व कर समाविष्ट आहेत. तसेच, याशिवाय या ऑफरमध्ये तुम्ही फक्त १५ रुपयांमध्ये तुमची आवडती सीट निवडू शकता. यासोबतच तुम्हाला २००० रुपयांचे तिकीट व्हाउचर देखील मिळेल.

कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवर या सेलची माहिती दिली आहे. यामध्ये तुम्ही पुढील वर्षी १५ ऑगस्टपासून ते ३० मार्च २०२४ या कालावधीसाठी तिकीट बुक करू शकता. या ऑफर फॉर सेलद्वारे कोणताही प्रवासी अनेक ठिकाणी भेट देऊ शकतो. या सेलमध्ये ग्राहकांना कमी किमतीत तिकिटांसह अनेक फायदे मिळत आहेत. कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी २००० रुपयांचे फ्लाइट व्हाउचर देखील दिले आहे. हे एक कॉम्प्लिमेंटरी व्हाउचर असणार आहे.

या ठिकाणी करता येणार विमान प्रवास….
मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद यांसारख्या लोकप्रिय देशांतर्गत हवाई मार्गांवर १५१५ रुपयांची एकेरी विमान प्रवास ऑफर दिली जात आहे. ही ऑफर थेट देशांतर्गत बुकिंगवर वन-वे भाड्यावर वैध आहे. या ऑफर अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मर्यादित सीट्स उपलब्ध आहेत. दरम्यान, कंपनीचे म्हणणे आहे की, हा फायदा ग्रुप बुकिंगमध्ये मिळणार नाही आणि तो इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडला जाऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *