महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । जगभरात लग्नाचं बंधन हे अगदी पवित्र मानलं जातं. केवळ हिंदू संस्कृतीतच नाही, तर इतर धर्मांमध्येही या नात्याला पवित्र मानलं गेलं आहे. लग्नाच्या जोड्या या स्वर्गात जुळतात असं म्हटलं जातं. मात्र, कित्येक वेळा काही कारणास्तव हे नातं थांबवावं लागतं. भारतात घटस्फोटांचं प्रमाण तेवढं जास्त नसलं, तरी पाश्चात्य देशांमध्ये हे भरपूर प्रणामात दिसून येतं.
अमेरिकेत सध्या घटस्फोटाचं प्रमाण भरपूर वाढताना दिसत आहे. फोर्ब्स संस्थेने केलेल्या एका रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे. या अहवालात घटस्फोटांची वाढलेली टक्केवारी आणि त्याची कारणं दिली आहेत. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एका व्यक्तीचा निर्णय
फोर्ब्सच्या अहवालात असं समोर आलं, की अमेरिकेतील एकूण घटस्फोटांपैकी 73 टक्के प्रकरणांमध्ये हा निर्णय दोघांपैकी एकाच व्यक्तीचा होता. केवळ 27 टक्के घटनांमध्ये पती-पत्नीने चर्चा करून याबाबत निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं. आधी घटस्फोट झालेल्या व्यक्तींचा दुसऱ्यांदाही घटस्फोट होण्याचं प्रमाण 92 टक्के होतं.
कोणत्या वर्षी घटस्फोट?
एकूण घटस्फोटांपैकी बहुतांश प्रकरणं ही लग्नाच्या तिसऱ्या ते सातव्या वर्षांमध्ये दिसून आली. 4 टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीने एकमेकांसोबत 10 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला होता. (Global News)
पटत नाही म्हणून घटस्फोट
घटस्फोटांमध्ये एकमेकांशी न पटणं, कुटुंबीयांची नापसंती, एकमेकांची फसवणूक किंवा विवाहबाह्य संबंध अशा कारणांचा समावेश होता. ज्यांचा लग्नानंतर पहिल्याच वर्षात घटस्फोट झाला, त्यांपैकी 59 टक्के प्रकरणांमध्ये एकमेकांशी न पटणं हे कारण होतं. तर, 34 टक्के घटस्फोट हे विवाहबाह्य संबंधांमुळे झाले.
टळू शकले असते घटस्फोट
63 टक्के लोकांनी म्हटलं, की जर त्यांना लग्नाशी संबंधित वचनं आणि जबाबदाऱ्या यांची गांभीर्याने जाण असती, तर घटस्फोट टाळता येऊ शकत होता. जर लग्नानंतर पहिल्या वर्षातच काही गोष्टींवर नीट बोलणं, चर्चा झाली असती, तर घटस्फोट टळला असता असंही कित्येकांनी मान्य केलं