महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । १५ ऑगस्ट रोजी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे “डिफेंस फोर्स लीग” आणि “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती” यांचा वतीने भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला.
सकाळी ८:४५ वाजता भारतीय वायुसेनेचे पूर्व एयर मार्शल शशिकुमार रामदास AVSM,PVSM,VM,VSM. यांचा हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डिफेंस फोर्स लीगचे संस्थापक नरेश गोल्ला, अध्यक्ष एक्स पैरा विंग पूर्व कमांडो रघुनाथ सावंत, अध्यक्ष एक्स सुबेदार मेजर यशवंत महाडीक, एक्स सुबेदार मेजर खोत, एयर फोर्स वेटेरन शरदचंद्र फाटक, सुनील वडमारे, सिददाराम बिराजदार, मुजीब खान, राजेंद्र जाधव, दृष्टी जैन, अजय खोमणे, नीलेश विसपुते, विनी आहुजा. विनोद शिंदे , वर्षा शिंदे, स्मारक समितीचे मनोज गजभार, सुरेश रोकडे, मेजर पीएस ढोबळे, विनोद गायकवाड, मेजर विनोद कांबळे, मेजर सुरेश भालेराव , राधाकांत कांबळे- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर. पालिकेचे कर्मचारी चंद्रकांत कुंभार- स्थापत्य विभाग, दयानंद चव्हाण- उद्यान विभाग, राजेश चटोले- आरोग्य विभाग, इंजि. देवेंद्र तायडे, बापूसाहेब गायकवाड, वि.एम. कबीर – सेक्रेटरी कॉँग्रेस डिस्ट्रिक्ट मायनॉरिटी कमिटी, अजिज शेख RPI वाहतूक आघाडी, लक्ष्मण रोकडे, सुजाता नवघरे- बुद्ध लेणी मुक्त आंदोलन समिती महाराष्ट्र, बळीराम रोकडे, रवी कांबळे, महायान मसुरे, विशाल कांबळे, राजू साळवे, ईश्वर कांबळे, संतोष जोगदंड, अरुण मैराळे, लक्ष्मण गजभार, किशोर तुरुकमारे, राजू धुरंधरे, वामन गजभार, विजय ढवळे, प्रवीण कांबळे, सिद्धू कांबळे, राजेश सरतापे, कपिल कांबळे, कौशल्या गजभार, श्यामा जाधव, वंदना यंकुळे, वंदना गायकवाड, सुमन शिंदे, राधा गायकवाड, सज्जनाबाई गायकवाड, विशाल गजभार, राहुल कांबळे, सुभाष जाधव, वावरे सर यांची उपस्थिती होती .
याप्रसंगी एक्स पैरा कमांडो रघुनाथ सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की “ हर घर तिरंगा प्रमाणेच हर घर संविधान असेन तर हर दिल मे तिरंगा होगा, संविधान जागृती ची काळाची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच यावर डिफेंस फोर्स लीग तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली .
तसेच समता दलाच्या साथीने डिफेंस फोर्स लीग तर्फे उपस्थितांनी अमर जवानांना आदरांजली वाहिली व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली .
महापालिकेचे अधिकारी चव्हाण यांनी हा समारोह आयोजित करण्यासाठी “डिफेंस फोर्स लीग” आणि “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती” यांचे आभार मानले, तसेच यापुढेही दर वर्षी आशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पालिकेतर्फे सर्व विभागांचे सहकार्य असेन असे आश्वासन दिले. सर्व जिल्ह्यांमध्ये आशा प्रकारचे आयोजन पूर्व सैनिकांसोबत घेतले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले .