Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा हा शिधा असेल. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव. (आदिवासी विकास विभाग)
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा. (अन्न व नागरी पुरवठा)
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार. (कौशल्य विकास)
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी. ( महसूल विभाग)
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द. (गृह विभाग)
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला. ( महिला व बाल विकास)
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे. (सहकार विभाग)
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन. (विधी व न्याय विभाग)
मंडणगड येथे दिवाणी न्यायालय. (विधी व न्याय विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *