आयुष्यमान भारतसह केंद्र सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ? ; कॅगचे ताशेरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगने हे ताशेरे ओढले आहेत. कॅगच्या अहवालानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या देशात एक देश विरोधी आणि मोदी विरोधी संस्था आहे. तीचं नाव कॅग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कटाची बळी पडली आहे. या संस्थने गेल्या काही दिवसात एकदोन नव्हे तर सात घोटाळे उघड केले आहेत. त्यामुळे कॅगवर मोदींनी तात्काळ ईडीचा रेड मारली पाहिजे, असा टोला सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला आहे.

कॅगची हिंमतच कशी झाली?
सात घोटाळ्याचा रिपोर्ट देण्याची कॅगची हिंमतच कशी झाली? अडीचशे कोटीचे 1800 कोटी कसे झाले? असा कोणता चमत्कार घडला? असा चिमटा काढतानाच कॅगने टोल प्लाझाचे ऑडिट केले. त्यात 132 कोटी रुपयांची लूट करण्यात आल्याचं म्हटलं आहे, असा दावाही श्रीनेत यांनी केला आहे.

मोदी बोलणार की नाही?
आयुष्यमान भारत योजनेत साडे सात लाख लोकांनी एकाच नंबरने रजिस्ट्रेशन केले होते. 88 हजार मृतांच्या नावाने क्लेम करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर होत आहे. विकासाच्या प्रकल्पात प्रचंड घोटाळा झाला आहे. सिंचन विभागने चुकीच्या लोकांना कंत्राट दिलं. ग्रामविकास मंत्रालयात घोटाळा झाला आहे, असं सांगतानाच पंतप्रधानांच्या डोळ्यासमोरच असं होत आहे. त्यावर आता पंतप्रधान बोलणार की नाही? असा सवालही त्यांनी केला.

एका रस्त्यासाठी…
एक रस्ता बनवण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी 18 कोटींची मंजुरी देण्यात आली. मात्र, नंतर कोणत्याही मंजुरीशिवाय हाच रस्ता 251 कोटी खर्चून बनवला आहे. हा एवढा मोठा घोटाळा आहे, असा दावा आपच्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी केला आहे.

या योजनांवर कॅगचे ताशेरे…
भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची तूट

आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल केंद्रावरून नोंद

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेलाया 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.

अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेचे फलक लावण्यासाठी वळवले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान

द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *