राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी अमित ठाकरे बसले कार्यकर्त्यांमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ ऑगस्ट । पिंपरी – चिंचवड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत पत्रकारांनीदेखील नेत्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असे म्हटले. दरम्यान, राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी राजपुत्र ‘अमित ठाकरे’ हे बाल्कनीत बसून राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते. त्यामुळे अमित ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून कौतुक होताना बघायला मिळाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेधदेखील राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

अमित ठाकरे यांनी मंचावर न बसता नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बसून राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं. यामुळे त्यांच्याकडे पत्रकारांसह नागरिक आणि कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलं होतं. अमित ठाकरे यांच्यासाठी अगोदर मंचाच्या समोर बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती. परंतु, तिथं न बसता त्यांनी बाल्कनीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बसत राज ठाकरे यांचे भाषण ऐकलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *