महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । झिम्बाब्वेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. माजी गोलंदाज हेन्री ओलोंगा यांनीच सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. परंतु, आता त्यांनी पुन्हा ट्वीट करून हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचं कर्करोगाशी लढताना निधन झाल्याचे वृत्त पसरले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर अवघ्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी हीथच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर आता हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला असून त्यात तो जिवंत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओलोंगा यांनी आधीचं ट्वीट डिलिट केले आहे.
I can confirm that rumours of the demise of Heath Streak have been greatly exaggerated. I just heard from him. The third umpire has called him back. He is very much alive folks. pic.twitter.com/LQs6bcjWSB
— Henry Olonga (@henryolonga) August 23, 2023
“हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त अफवा आहे. मी त्याच्याकडूनच जाणून घेतले आहे. तो जिवंत आहे”, असं ट्वीट ओलोंगा याने केलं आहे. यासोबत त्याने हीथसोबतचे चॅट ट्वीट केले आहे.