Pune Dagdusheth Ganpati : यंदा दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati Temple) बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *