महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। ताजं दूध प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही. दूध जास्तवेळ टिकत नाही, त्यामुळे अनेक व्यावसायिक यावर प्रक्रिया करून त्याची पावडर बनवतात. ही पावडर एका हवाबंद बॉक्समध्ये भरली जाते. त्यानंतर यातील फक्त एक चमचा पावडर देखील तुम्ही विविध पदार्थांमध्ये दूधाप्रमाणे वापरता येते.
अनेक व्यक्ती शहरात अशा ठिकाणी राहतात जिथे सहज ताजं दूध मिळत नाही किंवा प्रवासात देखील नागरिकांना ताजं दूध मिळणं कठीण असतं. त्यामुळे अशावेळी पॅकबंद बॉक्समधील ही दूधाची पावडर अनेकांना उपयोगी पडते. चहामध्ये दूधाऐवजी दूध पावडरचा एक चमचा देखील भरपूर होते. मात्र किती केलं तर हे दूध नाही. त्यामुळे त्याचे आपल्या आरोग्यावर काही वेगळे परिणाम देखील होतात. त्याबाबत आज जाणून घेणार आहोत.
ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल
दूध पावडरमध्ये जास्तप्रमाणात ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल असते. ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल हा पदार्थ थोडा चिकट असतो. त्यामुळे तो लगेचच आपल्या आतड्यांना चिकटतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालत नाही. त्यामुळे ही पावडर आपल्या आरोग्यासाठी काही प्रमाणात घातक आहे.
चव आणि पोषक तत्व
तसं पाहिलं तर या दूधामध्ये देखील ताज्या दूधातील सर्व पोषक तत्व असतात. मात्र प्रक्रिया करून बनवल्याने याला अस्सल दूधाची चव राहत नाही. लहान मुलांना तुम्ही हे दूध दिल्यास त्यांना चव न आवडल्याने ते पावडरचं दूध पिण्यास नकार देतात.
स्वस्त
दूध पावडर अनेक व्यक्ती यासाठी वापरतात कारण ती खिशाला परवडणारी असते. महागडं दूध ज्या किंमतीला मिळतं त्याच्या निम्म्या किंमतीत तुम्ही मिल्क पावडरचा एक बॉक्स खरेदील करू शकता.