१२ वीच्या निकालाची तारीख २० मेला मतदान संपताच होणार जाहीर? उद्या निकाल लागला तरी मूळ गुणपत्रिका कधी मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. यंदा राज्यातून परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन अशीही चर्चा रंगली आहे की आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर केला जाईल. आज २० मे च्या संध्याकाळी मतदानाची वेळ संपली की कदाचित मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते व उद्या (२१ मे) निकाल लागू शकतो अशी माहिती सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण लक्षात घ्या अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

१२ वीचा निकाल उद्या नसला तरी ‘ही’ शक्यता कायम!
शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण देत बोर्डाच्या वतीने अधिसूचना सुद्धा जाहीर केली होती. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले होते. यानुसार अगदी २१ मे तारीख नक्की नसली तरी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यात निकाल समोर येण्याची नक्कीच शक्यता आहे. असे झाल्यास आयत्या वेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या अधिकृत वेबसाईट (HSC Results Direct Link)
hscresult.mahahsscboard.in
mahahsscboard.in
maharesult.nic.in
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
https://education.indianexpress.com/embed/board-exams?board-slug=cbse-board-result
१२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत कधी मिळणार?
गेल्या वर्षी, १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाल्यावर ५ जूननंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण १० दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येते.

बारावीच्या निकालानंतर ATKT परीक्षा कुणाला व कधी द्यावी लागेल?
गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये एटीकेटीच्या परीक्षा होतात. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांना जे विद्यार्थी पूर्ण करत नाहीत त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. आपल्या माहितीसाठी या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने ३५ टक्के गुण मिळवलेले असायला हवेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *