IPL: हे आहेत आयपीएलमधील सर्वाधिक सामने हरणारे कर्णधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार ठरले, मात्र तुम्हाला माहीत आहे का की सर्वाधिक सामने हरण्याच्या कर्णधारांच्या यादीत कोण कोण आहे.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सला माहीने ५ वेळा विजेतेपद जिंकून दिले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की कॅप्टन कूल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने हरणारा कर्णधारही आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ९१ सामने हरले आहेत.

या यादीत दुसरा नंबर लागतो विराट कोहलीचा विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूला ७० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

यानंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितच्या नेतृ्त्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकला. मात्र तो सर्वाधिक सामने हरणारा तिसरा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात ६७ सामन्यात पराभव मिळाला आहे.

या दिग्गजानंतर गौतम गंभीरचे नाव आहे. गंभीरला कर्णधार म्हणून ५७ सामन्यात पराभव सहन करावा लागला. या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही भूषवले.

डेविड वॉर्नरचा यामध्ये पाचवा नंबर लागतो. डेविडने कर्णधार म्हणून ४० सामने हरले आहेत. यानंतर अॅडम गिलख्रिस्ट. त्याने कर्णधार म्हणून ३९ सामन्यात पराभव पाहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *