ऐन वारीच्या तोंडावर पंढरपुरात एकजण कोरोनाबाधित आढळून आला

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पंढरपूर – ठाण्यावरून करकंब येथे आलेला एकजण आज कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने पंढरपूर तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे. करकंब येथील एकजण ठाणे येथे वाहन चालक म्हणून काम करत होता. तो राहत असलेल्या खोलीतील इतरांना कोरोनाची लागण झाल्याने, तो गावी आला. तस धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्ती ही ठाणे ते पनवेल पर्यंत बसमधून व तेथून पुढे ट्रॅनकरमधून मोडलिंबला आला. त्यानंतर मोडलिंब मधून दुचाकीवरून करकंब येथे गुरूवारी (दि. २५ जून रोजी) रात्री आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्याने स्वत:हून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याची विनंती केली होती.

त्यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार सरवदे यांनी शुक्रवारी सकाळी त्याचा व करकंब मधील इतर एका व्यक्तीचा स्वब घेऊन सोलापूर ला पाठवले होते. त्यानंतर त्या व्यक्तीस वाखरी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज त्याचे अहवाल प्राप्त झाले असून करकंब व्यक्तीचा अहवाल निघेटिव्ह तर ठाणे येथून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ठाण्यावरून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून महत्वाची बाब म्हणजे ही व्यक्ती जास्त व्यक्तीच्या संपर्कात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link