![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – महावितरणने वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. तसेच ग्राहकांशी वेबिनार आणि मेळाव्याद्वारे संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमध्ये महावितरणने मीटर रिडींग घेणे बंद केले होते. मात्र जूनमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच रिडींग सुरू करत अवाच्या सवा बिले पाठवली. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेत त्याचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निकारण कक्ष सुरू केला आहे. महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना त्यांचे वीज बिल समजावून सांगणार आहेत.
