( औरंगाबाद ) संभाजीनगरमध्ये 2446 कोरोनामुक्त; आतापर्यंत 238 जणांचा मृत्यु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संभाजीनगर – संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 2082 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 244 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत 238 जणांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4766 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

शहर हद्दीतील रुग्ण
सिंहगड कॉलनी (1), टिव्ही सेंटर, जाधववाडी (3),विठ्ठलनगर एन-2 (1),खोकडपुरा (2), जयभवानी नगर (1), नॅशनल कॉलनी (2), एम.जी.एम जवळ , एन-6 सिडको (1), गुरू दत्तनगर गारखेडा (1), भगवानपुरा (1), अरिष कॉलनी, कटकट गेट (1), मिलिंद नगर (1), सिटी चौक (1), एन 8 सिडको (1), फुले नगर गुरुगोविंदसिंगपुरा (1), सादात नगर (1), रेणुकामाता मंदिराजवळ, एन-9 सिडको (3), सुतगिरणी चौक, गारखेडा (1), शिवाजी नगर, सिडको (1),तेरावी योजना, जयभवानी नगर (2), शिवाजी नगर (1)

ग्रामीण भागातील रुग्ण
पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), पैठण (1), वरुडकाजी (1), वाळुज, गंगापुर (2),बजाज नगर, वाळुज (1), गल्लेबोरगाव (1), फत्ते मैदान (1), शिवशंभुनगर, वैजापुर (1), बाभुळगांव ,वैजापुर (1), सप्तश्रृंगी कॉलनी, वलदगांव (1), ग्राम पंचायत शेजारी, सातारा परिसर (1), निलकमल हाऊसिग सोसा. बजाज नगर (1), जुने रांजणगांव, (1), वडगांव कोल्हाटी (1), समता कॉलनी वाळुज (1)

चार जणांचा मृत्यू
दिवसभरात घाटीयेथे 4 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 238 जणांचा मृत्यू झालेला आहे. घाटीमध्ये भोईवाडा येथील 66 वर्षीय पुरुषाचा, बजाजनगर वाळूज येथील 57 वर्षीय पुरुषाचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 27 वर्षीय स्त्रीचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 58 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *