महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। महाविकास आघाडीचे महायुतीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मागणी केली होती. परंतु अमोल कीर्तीकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार दिला आहे. मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही उमेदवारास देणे हे कायद्यात बसत नसल्याचं कारण दिल्याची माहिती मिळत आहे.
या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. सगळ्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांनी केला आहे. शिवाय त्यांनी ईव्हीएम मशीन मतांची फेर मतमोजणीची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली.
मात्र, निकालाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी नाकारली होती. निकालाच्या चार दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना (Vote Counting Center) सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासंदर्भात अमोल कीर्तिकर यांनी पत्र दिले होते. मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ झाल्याचे सांगत ४ जून रोजीचे दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज कीर्तिकरांनी मागितले होते.
आता यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर यांनी दिलेल्या विनंती पत्रानंतर मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला (Lok Sabha Election) आहे. अशाप्रकारे सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकरांसमोर आणली असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.
त्यामुळे या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर (Mumbai Suburban District Collector) कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. अमोल कीर्तीकर यांनी यासगळ्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिले आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकरांचा केवळ ४५ मतांनी पराभव झाला आहे.