Inflation Rate in India : १५ महिन्यांचा रेकॉर्ड मोडत महागाईचा भडका ; सर्वसामान्यांचा खर्च वाढला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला आहे. देशातील घाऊक महागाईचा दर १५ महिन्यांतील उच्चांकीवर पोहचला आहे. आकडेवारीनुसार मे महिन्यांत सर्वाधिक महागाई वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १४) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

खाद्यपदार्थ, पालेभाज्या आणि उत्पादित खाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही महागाई वाढली, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात महागाईने मोठी झेप घेतली आहे. ज्याचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारात दिसून येत आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १.२६ इतका होता. मे महिन्यात हाच दर २.६१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच महिन्याभराच्या कालावधीत महागाईचा दर दुप्पट झाला आहे. याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसत आहेत.

महागाईने बिघडवलं सर्वसामान्यांचं गणित
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यात अन्नधान्याच्या किंमत वाढीचा दर ७.७४ टक्के नोंदवला गेला होता. मे महिन्यात हाच दर ९.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

भाजीपाल्यातील महागाई दर एप्रिल महिन्यात २३.६० टक्के नोंदवण्यात आला होता. हाच दर मे महिन्यात सर्वाधिक ३२.४२ टक्क्यांवर पोहचला आहे.

कांद्याच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. एपिल महिन्यात कांद्याच्या किमती ५९.७५ टक्के दराने कडाडल्या होत्या. आता हाच दर वार्षिक तुलने ५८.०५ टक्क्यांवर आहे.

बटाट्याचा महागाई दर देखील वाढला आहे. तर डाळींच्या महागाईत मे महिन्यात २१.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर ०.७८ टक्के इतका आहे. एप्रिल महिन्यात हाच दर (-) ०.४२ टक्के इतका होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *