महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुन ।। Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या बाथरूममध्ये पुढील गोष्टी असल्यास गरिबी येऊ शकते. वास्तुनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेऊ नये हे जाणून घेऊ या.
ओले कपडे
जर बाथरूममध्ये ओले कपडे असतील तर ते धुवा आणि ताबडतोब सुकविण्यासाठी घराबाहेर ठेवा. ओले कपडे चुकूनही बाथरूममध्ये ठेऊ नका. कारण यामुळे सूर्यदोष होतो. ओले कपडे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्यांना बाथरूममध्ये लटकवून ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि वाद वाढतात.
तुटलेली चप्पल
तुटलेली चप्पल बाथरूममध्ये चुकुनही ठेवू नका. तुटलेली चप्पल देखील नकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की तुटलेली चप्पल घरातील ग्रहांची अशुभ स्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे तुटलेली चप्पल ताबडतोब काढा आणि त्या जागी नवीन चप्पल घाला.
रिकामी बादली
वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरामध्ये अशुभ निर्माण होते. त्यामुळे बाथरूममध्ये नेहमी पूर्ण बादली ठेवावी. रिकामी बादली हे गरिबीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की रिकाम्या बादलीमुळे घरातील धनाची हानी होऊ शकते. त्यामुळे नेहमी रिकामी बादली भरून ठेवा किंवा बाथरूममधून काढा.
तुटलेला आरसा
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा ठेऊ नका. तुटलेला आरसा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकतो. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे बाथरूम आणि घरात तुटलेला आरसा ठेऊ नका. त्यएवजी नवीन आरसा ठेवावा.
झाडे
वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे ठेऊ नका. बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात. यामुळे घरात वास्तूदोष वाढतो. झाडांना पुरेसा सुर्यप्रकाश आणि ताजी हवा हवी असते. यामुळे बाथरूममध्ये झाडे ठेऊ नका.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.