Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, परंतु ...... - Maharashtra 24

पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, परंतु ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र हे औषध करोना बरं करणारं औषध म्हणून विकता येणार नाही. तर प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल. प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून कोरोनिलला मोदी सरकारने मान्यता दिली आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध करोनावरचा उपाय असणारं औषध म्हणून विकता येणार नाही. मात्र प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यात पतंजलीने कोरोनिल नावाचं औषध आणलं होतं या औषधाने करोना बरा होतो असाही दावा करण्यात आला होता. मात्र सरकारकडून नोटीस येताच तो दावा मागे घेण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *