WI vs SA : T20 विश्‍वचषक स्‍पर्धेतून यजमान वेस्‍ट इंडिज ‘आ‍ऊट’, द. आफ्रिकेची सेमी फायनलमध्‍ये धडक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। T20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्‍ये आज दक्षिण आफ्रिका आणि वेस्‍ट इंडिज आमने-सामने होते. दोन्‍ही संघांसाठी आजचा सामना करा किंवा मरा असा होता. अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात अखेर दक्षिण आफ्रिका संघाने बाजी मारली. ओबेडमॅक कॉयच्‍या शेवटच्‍या षटकातील पहिल्‍या चेंडूवर मार्को यानसेन याने षटकार ठोकत दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलचे तिकीट पक्‍के केले. या सामन्‍यात डकवर्थ लुईस नियमानुसार, दक्षिण आफ्रिकेसमोर 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य होते. संघाने हे आव्‍हान 16.1 षटकांमध्‍ये सात गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यजमान वेस्‍ट इंडिज टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतून बाहेर पडला आहे.

आजच्‍या सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्‍याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामन्‍यात षटके प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य होते. मात्र, पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार तीन षटके कमी करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेसमोर 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य होते. संघाने हे आव्‍हान 16.1 षटकांमध्‍ये सात गडी गमावून पूर्ण केले.

मार्कोने षटकार ठाेकत केले सेमी फायनलचे तिकीट पक्‍के
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन षटकांनंतर 2 बाद 15 धावा असताना पावसाने व्यत्यय आणला. सामना सुरू झाला तेव्हा तीन षटके कमी करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेला 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य मिळाले. म्हणजेच त्यांना उर्वरित 15 षटकांत 108 धावा करायच्या होत्या. छोट्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने ही धावसंख्या गाठली. दक्षिण आफ्रिकेने 16.1 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. शेवटच्‍या षटकात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्‍यासाठी ६ चेंडूत पाच धावांची गरज हाेती. ओबेडमॅक कॉयच्‍या शेवटच्‍या षटकातील पहिल्‍या चेंडूवर मार्को यानसेन याने षटकार ठोकत दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलचे तिकीट पक्‍के केले. मार्को यानसेनने 14 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 29 धावांची आणि हेनरिक क्लासेनने 22 धावांची खेळी खेळली.

यजमान वेस्‍ट इंडिज स्‍पर्धेतून बाहेर
या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यजमान वेस्‍ट इंडिज टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतून बाहेर पडला आहे. सुपर-8 च्या गट-2 मधून उपांत्य फेरी गाठणारे दोन संघ निश्चित झाले. दक्षिण आफ्रिका अव्वल, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना सुपर-8 च्या गट-1 मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल, तर इंग्लंड संघाचा सामना गट-1 मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी होईल. उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *