महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। इक्विटी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने संदीप टंडन यांचं मालकीच्या क्वांट म्युच्युअल फंडाविरुद्ध फ्रंट रनिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सेबीने क्वांट म्युच्युअल फंडाच्या अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून सध्या हैदराबाद आणि मुंबई या फंड हाऊसच्या दोन ठिकाणी जप्ती आणि शोध मोहीम हाती घेण्यात आली. सेबीकडून या फंडाला २०१७ मध्ये परवाना मिळाला होता.

क्वांट म्युच्युअल फंड देशातील अतिशय वेगाने प्रगती करणारा म्युच्युअल फंड असून सध्या या फंड हाऊसचे असेट ९०,००० कोटी रुपये आहे, जी २०१९ मध्ये १०० कोटी रुपये होती. यावर्षी जानेवारीमध्ये फंड हाऊसची मालमत्ता ५०,००० कोटींच्या पुढे गेली असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये २६ योजना आणि ५४ लाख पोर्टफोलिओ आहेत.
संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन्सद्वारे होणार नफा सुमार २० कोटी रुपये असून सेबीच्या मॉनिटरिंग टीमला संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्न आढळल्यानंतर फंड हाऊसच्या कामकाजाचा शोध सुरू करण्यात आला. फंड मॅनेजर किंवा कंपनीच्या अनियमिततेमुळे गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागू शकतो. तसेच या प्रकरणामुळे निधीची विश्वासार्हता कमी होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पैसे काढून घेऊ शकतात.
फ्रंट रनिंग म्हणजे काय?
फ्रंट रनिंग बेकायदेशीर कामाच्या संदर्भात म्हटले जाते जिथे फंड मॅनेजर किंवा ब्रोकरला आगामी मोठ्या व्यापाराची आधीच माहिती असते ज्यामुळे, ते आगाऊ ऑर्डर देतात आणि प्रचंड नफा कमावतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशनमधून नफा सुमारे २० कोटी रुपये आहे. त्यामुळे फ्रंट रनिंग बंद करण्यासाठी सेबी म्युच्युअल फंडांविरुद्ध आक्रमक कारवाई करत आहे. उल्लेखनीय आहे की मागील पाच आणि तीन वर्षात या फंडाने खूपच चांगली कामगिरी केली. स्मॉलकॅप फंड सध्या २०,००० कोटींची अधिक किमतीच्या निधीचे व्यवस्थापन करत असून फंडाची आतापर्यंतची कामगिरी चांगलीच राहिली आहे.