महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। T20 World Cup Semi Final : आज वर्ल्ड कप 2024 मध्ये यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा तीन गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने आता वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
T20 World Cup Semi Final : सेमी-फायनलमध्ये 2 टीम कन्फर्म! 2 बाहेर, तर ‘या’ 2 वर टांगती तलवार, जाणून घ्या संपूर्ण समीकरण
WI vs SA : ‘चोकर्स’ दक्षिण आफ्रिकेसाठी पाऊस ठरला वरदान! थाटात सेमी-फायनलमध्ये मारली एन्ट्री; वेस्ट इंडिजचे भंगले स्वप्न
‘या’ दोन संघांनी गाठली उपांत्य फेरी
टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ होता. इंग्लंडने अमेरिकेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री मारली.
‘हे’ दोन संघ बाहेर
या वर्ल्ड कपचे यजमान देश वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. या दोन्ही संघांचा गट-2 मध्ये समावेश करण्यात आला होता. यूएसएला इंग्लंडने तर वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने बाहेर काढले.
आता ‘या’ दोन संघांमध्ये रंगली लढत
टीम इंडिया ग्रुप-1 मधून सेमीफायनलसाठी जवळपास पात्र ठरली आहे. तर बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत आहे. या दोन्ही संघांना आपापले सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडियाशी होणार असून अफगाणिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे.