AFG v BAN: विश्वविजेता ऑस्ट्रेलिया बाहेर ; अफगाणिस्तान बांगलादेशला हरवत सेमी फायनलमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। Afganistan Reached Semifinal Of T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बांगलादेशचा ९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले आहे. अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नवीन उल हकने १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशला ऑल आऊट केलं. अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११५ धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ २० षटकांत ११६ धावाही करू शकला नाही. सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला आणि अखेरीस सामन्याचे एक षटकही कमी केले. ११.४ षटकांनंतर पाऊल पडल्याने डीएलएसनुसार अफगाणिस्तानचा संघ पुढे होता. त्यानंतर षटक कमी करण्यात आले आणि लक्ष्य ११४ धावांचे करण्यात आले. पण यानंतरही संघाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू होता, तर वाराही सामन्यात व्यत्यय आणत होता. बांगलादेशकडे अफगाणिस्तानने दिलेल्या ११६ धावा १२.१ षटकांत पूर्ण करत सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी होती. पण अफगाणिस्तान कडवी झुंज देत मैदानात होता. रशीद खानने ४ विकेट्स घेत बांगलादेशला अडवले. तर अफगाणिस्तानने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आणि झटपट विकेट्स घेत बांगलादेशवर दबाव टाकला. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत सुरू होती. बांगलादेशला १८ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. गुलबदीनने १७व्या षटकात अवघ्या ४ धावा दिल्या. तर १८वे षटक नवीन उल हकने तिसऱ्या चेंडूवर तस्कीनला क्लीन बोल्ड केले तर चौथ्या चेंडूवर मुस्तफिजूरला पायचीत करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची फलंदाजी बाजू चांगलीच ढासळली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गुरबाजने ५५ चेडूंत १ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. तर इब्राहिम झादरानने २९ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. तर अझमतुल्लाने १०, गुलबदीनने ४ धावा केल्या, नबी १ धाव तर करीम ७धावा करून बाद झाला. यानंतर रशीद खानने १९ धावा केल्या. यासह अफगाणिस्तानने ५ विकेट्स गमावत ११५ धावा केल्या. अधिक धावा न केल्याने अफगाणिस्तानवर धावा वाचवण्याचं मोठं काम होतं. बांगलादेशकडून रशीद हुसेनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर तस्कीन. मुस्तफिजूरने १-१ विकेट मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *